दिंडोरी तालुक्यातील 121 किलोमिटर ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जाउन्नती रस्त्यांचे होणार मजबुतीकरण, नुतनीकरण
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी


दिंडोरी - तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे असून  मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे मात्र अनेक प्रमुख रस्तेही ग्रामीण मार्ग असल्याने त्यांना कमी निधीची तरतूद होत असल्याने रस्ते लवकर खराब होत होते त्यामुळे ज्या रस्त्यांवर वाहनांची अधिक वर्दळ आहे त्या सर्व रस्त्यांना दर्जा उन्नती साठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील सुमारे 121किलोमिटर  रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग होणार असून सदर रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुती करण होणार आहे. 

दिंडोरी तालुक्यात प्रत्येक गावात रस्त्यांचे जाळे आहे मात्र त्यातील बहुतांशी रस्ते ग्रामीण मार्ग आहेत.तालुक्यात हरितक्रांती व औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याने गावोगाव वाहनांची संख्या मोठी असून शेतमाल व इतर जड वाहतूक मोठ्याप्रमाणात सर्वच प्रमुख मार्गांवर होत आहे सदर रस्ते हे ग्रामीण मार्ग असल्याने तेथील कामांना खूपच कमी निधी मिळत असल्याने रस्ता जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ ,कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवत त्यांना सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्त्यांचे रुंदीकरण मजबुती करण होण्याच्या दृष्टीने अहवाल बनविण्यास सांगितले होते.त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व रस्त्यांचे दर्जा उन्नती प्रस्ताव शासनास पाठवले होते. त्यानुसार भनवड लखमापूर कादवा खेडगाव शिंदवड  वडनेर हा रस्ता राज्यमार्ग झाला आहे .कोचरगाव उमराळे दिंडोरी पालखेड लोखंडे वाडी जोपुळ पिंपळगाव हा रस्ता राज्य मार्ग होणार आहे . ननाशी वलखेड हा रस्ताही राज्य मार्ग प्रस्तावित आहे.नाशिक दिंडोरी वणी कळवण रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाने  28 जून ला नुकताच पुढील प्रमाणे 121 किमी चे ग्रामीण इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नती दिली आहे.ग्रामीण मार्गांना खूप कमी निधी मिळत होता तर सदर मार्ग आता  जिल्हा मार्ग झाल्याने मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असल्याने रस्त्यांचे कामे मजबूत होणार आहे.

खालील मार्ग जिल्हा मार्ग होणार आहे कंसात प्रजीमा क्रमांक)


*कोशिंबे देवपूर वनारे तळ्याचा पाडा भनवड (प्रमुख जिल्हा मार्ग 181)

*कोचरगाव रवळगाव गयाचीवाडी देहरे वाडी रासेगाव इंदोरे मडकीजाम (प्रमुख जिल्हा मार्ग 182)

बोपेगाव जोपुळ खडकसूकने मोहाडी गणोरवाडी आंबे दिंडोरी खतवड रासेगाव (प्रमुख जिल्हा मार्ग 183)

*निळवांडी हातनोरे उमराळे धावूर फोफळवडे (प्रमुख जिल्हा मार्ग 184)

*जालखेड श्रीरामनगर नळवाडी (प्रमुख जिल्हा मार्ग 185)

*मावडी औतळे आंबे वणी वरखेडा सोंनजांब कावळेवाडी खेडगाव राजीव नगर वडनेर भैरव चांदवड तालुका हद्द(प्रमुख जिल्हा मार्ग 186)दिंडोरी तालुक्यात गावोगाव रस्त्यांचे जाळे आहे व वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे परंतु अनेक रस्ते ग्रामीण मार्ग असल्याने त्यास निधि तरतूद कमी होत असल्याने अडचणी येत होत्या त्यामुळे तालुक्यातील सर्व रस्त्याचे फेर सर्वेक्षण करत त्यांची दर्जा उन्नती करण्यात आली असून त्यामुळे आता सदर रस्त्यांचे मजबुतीकरण नूतनीकरण करता येणार आहे बहुतांशी रस्त्यांची कामे मंजूर आहे मात्र पावसाळ्यापूर्वी कामे झाली असती तर ती खराब झाली असती म्हणून ती पावसाळा संपताच सर्व कामे सुरू होतील. रस्ता वीज व पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे

नरहरी झिरवाळ

उपाध्यक्ष विधानसभा दिंडोरी.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours