निसर्गरम्य ठिकाणी महाविद्यालयाची वास्तू  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी पर्वणी- ना.नरहरी झिरवाळ 
सुनिल घुमरे नासिक

दिंडोरी-  प्रतिनिधी

निसर्गरम्य परिसरात शांतता असलेल्या ठिकाणी महाविद्यालयाची इमारत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच असून मविप्र संस्थेने ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोहचवली असून संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट राज्य विधानसभा उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कला ,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथील नूतन इमारत उदघाटन ना.नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते.

ते पुढे म्हणाले मविप्र संस्थेच्या विकासासाठी यापूर्वी सहकार्य केले असून यापुढेही मदत करत राहील.या कार्यकारिणीने संस्थेचा जिल्यात मोठा विस्तार केला असून पदाधिकारी यांचे कामकाज उत्कृष्ट असल्याने पुढील काळातही सभासद पाठिंबा देत राहतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे होते.

यावेळी व्यासपीठावर कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, मविप्र सरचिटणीस श्रीमती  नीलिमा ताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ सुनील ढिकले, एन डी सी बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, कादवा व्हा चेअरमन शिवाजी बस्ते, कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब खातळे,उत्तम बाबा,दत्तात्रय दादा पाटील,नानासाहेब महाले, प्रल्हाद दादा गडाख, हेमंत वाजे, डॉ विश्राम निकम, सचिन दादा पिंगळे,सेवक संचालक नानासाहेब दाते, माजी गटविकास अधिकारी उद्धव अण्णा मोरे,कादवा संचालक बाळासाहेब जाधव, पुंडलिक राव पाटील, शिवाजी भाऊ जाधव, सदुअप्पा शेळके, अनिल दादा देशमुख, संजय अप्पा पडोळ, बाळासाहेब कदम, शहाजी सोमवंशी, एकनाथ खांडे, विश्वासराव देशमुख, चंद्रकांत राजे ,गुलाब तात्या जाधव ,विलास कड,कैलास मवाळ,मनोज ढिकले,विठ्ठल अपसुंदे,संस्थेचें शिक्षणाधिकारी डॉ एस के शिंदे, डॉ डी डी काजळे, डॉ एन एस पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवातीला कर्मवीरांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन केले.जनता इंग्लिश स्कुलच्या गितमंच ने स्वागतगीत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक दत्तात्रय दादा पाटील यांनी केले.त्यानी प्रास्तविकात संस्थेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यात भौतिक सुविधा व गुणात्मक वाढ केली असून सभासदांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणार आहे.

सभापती माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेने केलेले कामकाज विषयी माहिती सांगितली.

सरचिटणीस श्रीम निलिमाताई पवार यांनी बोलतांना संस्थेने शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित कामकाज केले असून कार्यकारी मंडळ व सभासदांच्या सहकार्याने चांगले कामकाज केले असून सभासदांच्या हितासाठी आरोग्य विमा देण्यात आला आहे.

कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी बोलतांना सांगितले शैक्षणिक क्षेत्रात मविप्र संस्थेने व कार्यकारी मंडळाने चांगले कामकाज केले आहे. 

अध्यक्षीय भाषणात डॉ तुषार शेवाळे यांनी बोलतांना सांगितले की उत्तर महाराष्ट्रात मविप्र संस्थेने आपल्या कामाचा ठसा उमटविला असून यासाठी लोकप्रतिनिधी, सभासद, हितचिंतक, यासह सर्वांचे योगदान मिळाले आहे.

आलेल्या मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ एस के कुशारे यांनी केले.

माजी प्राचार्य डॉ भवरे, डॉ वेदश्री ठिगळे, वणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डी दरेकर, माजी शिक्षणाधिकारी आर एल पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थी तुषार वाघ यांनाही मनोगत व्यक्त केले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, सभासद, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगीत शिक्षिका श्रीम देशपांडे मॅडम यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बलराम कांबळे व संतोष कथार यांनी तर आभार संस्थेचे चिटणीस डॉ सुनील ढिकले यांनी मानले.

 चौकट- 

देणगीदारांचा सत्कार - 

दिंडोरी येथील महाविद्यालय साठी ज्यांनी जमिनी दिल्या त्या जाधव कुटुंबातील सदस्य यांचा संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला  


फोटो-  ,  सुनिल घुमरे

मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालय नूतन इमारत उदघाटन प्रसंगी बोलतांना ना.नरहरी झिरवाळ ,व्यासपीठावर कादवा चेअरमन श्रीराम शेटे, मविप्र सरचिटणीस श्रीम नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ सुनील ढिकले, संचालक दत्तात्रय पाटील आदी।

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours